Vijaya Durga Aarti Lyrics In Hindi जय देवी श्री देवी अंबे श्री विजया दुर्गे लिरिक्स
Vijaya Durga Aarti Lyrics In Hindi | Jai devi shree devi ambe Lyrics
जय देवी श्री देवी अंबे श्री विजया दुर्गे
ओवाळीतो आरती तुजला भवभय हरी दुर्गे ॥
जय देवी श्री देवी अंबे श्री विजया दुर्गे
ओवाळीतो आरती तुजला भवभय हरी दुर्गे ॥
अंबे भवभय हरी दुर्गे ॥
कृपानिधी तू तव रूपासी नाही आदी-अंत
सर्व चराचर व्यापुनी राहसी न कळे ही मात
अंबे न कळे ही मात ॥
चंद्रसूर्य अन् वरुण इंद्र ही तुझ्याच आज्ञेत
वर्तती सारे नित नियमाने त्यांसी नसे खंत
अंबे त्यांसी नसे खंत ॥
जय देवी श्री देवी अंबे श्री विजया दुर्गे
ओवाळीतो आरती तुजला भवभय हरी दुर्गे ॥
अंबे भवभय हरी दुर्गे ॥
तू गौरी तू महालक्ष्मी तू आर्यादुर्गा
महाकाली तू महासरस्वती तू शांतादुर्गा
अंबे तू शांतादुर्गा ॥
रिद्धी सिद्धी त्या अष्टहि सिद्धी तूची सर्वांगा
ऐसी सर्व स्वरूपी नटसि तू विजयादुर्गा
अंबे तू विजयादुर्गा ॥
जय देवी श्री देवी अंबे श्री विजया दुर्गे
ओवाळीतो आरती तुजला भवभय हरी दुर्गे ॥
अंबे भवभय हरी दुर्गे ॥
नित्य घडावे दर्शन तुझे म्हणून मी भक्त जनी
केरी ग्रामी स्थापियले तुज मंदिर बांधोनी
अंबे मंदिर बांधोनी ॥
मार्गशीर्ष नवरात्र दशमीसि जत्रोत्सव जननी
नौकारोहण शिबीकोत्सव हो आनंद बहुत जनी
अंबे आनंद बहुत जनी ॥
जय देवी श्री देवी अंबे श्री विजया दुर्गे
ओवाळीतो आरती तुजला भवभय हरी दुर्गे ॥
अंबे भवभय हरी दुर्गे ॥
कुलदेवी तू अमुची सदोदित रक्षिसी आम्हां ते
सर्व कार्य सिद्धीला नेसी हरूनी संकटाते
अंबे हरूनी संकटाते ॥
तव चरणी स्थिर सदा रहावे मन माझे माते
विनवी तुला तव दास विष्णू हा तारी मला माते
अंबे तारी मला माते ॥
जय देवी श्री देवी अंबे श्री विजया दुर्गे
ओवाळीतो आरती तुजला भवभय हरी दुर्गे ॥
अंबे भवभय हरी दुर्गे ॥